रथ उत्सव :
रथ उत्सव हा पारंपरिक पद्धतीने रिती-रिवाजाने साजरा केला जातो. यात रथामध्ये पूर्वीच बैल गाडीमध्ये चांदीच्या देवीची व मुकुटाची मिरवणूकने केले जाते. असे म्हणतात इ.स. १८०० पासून ही मिरवणूक काढली जाते. या मिरवणूकी व दर्शनासाठी पंचकृषीतून भाविक येत असतात. वर्षातून दोनदा ही मिरवणूक निघते नवरात्रौत्सव व जत्रोत्सव सकाळी ८ वा. डोल-ताशे, लेझीम सोबत वाजत गायत सुरू करतात. मुले व गावकरी लेझीम, नाचत या मिरवणूकीत सहभागी होतात. या मिरवणूकीची सांगता मंदिरामध्ये देवीची व मुकुटाची स्थापना करून माहाआरतीने होते.
जत्रोत्सव :
जत्रा उत्सव हा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला पारंपारिक रिती-रिवाजाने साजरा केला जातो. या पंचकृषीतील सर्व भाविकासाठी हा मोठा उत्सव असतो. गावकरी याची तयारी १५ दिवस अगोदर पासून केली जाते. तीन दिवासाच्या ह्या उत्सवात विविध कार्यक्रम तसेच पुजा-अर्चा, मिरवणूक इत्यादीचा समावेश असतो.या उत्सवाची सुरूवात रथामध्ये चांदीच्या देवीची व मुकुटाची मिरवणूकने केले जाते. आपले केलेले नवस फेडण्यासाठी भाविका गर्दी करतात व मोठ्या उत्साहाने दर्शनाचा लाभ घेतात. संध्याकाळी देवीचा झेंडा व मोरपीस असलेली मानाच्या काठीच्या मिरवणूकीचा कार्यक्रम वाजत-गाजत व नाचत पार पडतो.
मंदिरात होम-हवन, पुजा-पाठ चालू असतात तसेच येथे आलेल्या असंख्य भाविकासाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात.
तिसर्या दिवसी संध्याकाळी कुस्त्यांचा आखाडा रंगतो. त्यास येथे हागामा म्हणतात. त्यासाठी फार लांबून कुस्तीपट्टू येतात व आपली कुस्तीच्या खेळामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करतात. या उत्सवाची ऐक वेगळीच शान असते.
नवरात्रौत्सव :
नवरात्री हा संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणारा उत्सव. परंतु हा उत्सव फारच महत्वाचा मानला गेला आहे. येथे नऊ दिवस प्रत्यक्ष देवी सोबत असल्याचा भास सतत भाविकाना होत असतो. नऊ दिवस चालणारा हा उत्सव अश्विनी शुध्द प्रतीपदेपासून. सुरू त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात.
जगदंबा देवीच्या मंदिरात घटस्थापना करतात. तसेच अखंड विणा नाद पूर्ण नऊ दिवस असतो. प्रत्येक दिवशी सकाळी पुजा-अर्चा, पारायण व वेगवेगळ्या ह. भ. प .चे कीर्तनाचा कार्यक्रम चालतो. त्यास पंचकृषीतून दर्शनासाठी भाविकाची प्रचंड गर्दी जमते. याही सोहळयाचे ऐक वेगळीच शान आहे.