टाहाकारी गावाची पार्श्वभूमी
‘श्री जगदंबा मातेच्या’ अस्तित्वाने पुनीत झालेल्या या गावाच्या ‘टाहाकारी’ या नावाला महत्वाची पार्श्वभूमी आहे. प्रभू श्रीराम वनवासात असताना रावणाने मायावी रूप धारण करून सीतेचे हरण केले आणि रावणाने याच मार्गाने लंकेला प्रयाण केले. सीतेला घेऊन जात असताना सीतेने रामाच्या नावाने येथे टाहो फोडला. म्हणून या गावाला ‘टाहाकारी’ असे म्हटले जाते.