प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. श्रीराम धरतीवरील वृक्षवेलीना, नद्यांना, वाहत्या झर्या॔ना ‘माझ्या सीतेला कुणी पाहिले आहे का ?` असे विचारत होते. त्याचवेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रा॔ना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने “श्रीराम” हे विष्णूचा आवतार असल्याचे अमान्य केले. परंतु शिवशंकराने श्रीराम हे विष्णूचा अवतार असल्याचे ठामपणे सा॔गितले. तरीही माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्रा॔ची परिक्षा घेण्याचे ठरविले. म्हणून सीतेचे रूप घेऊन माता पार्वतीला ऒळखले आणि मातेला वंदन करून “माते तू येथे कशी ?` अशी विचारणा केली. तेव्हा माता पार्वती खजील झाली आणि त्याचवेळी पार्वतीची फजिती झालेली पाहून शिवशंकर जोरजोरात हसू लागले. त्यामुळे पार्वती लज्जीत होऊन येथेच अंतर्धन पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली, तीच ही जगदंबा माता !