एक जागृत देवस्थान
आपल्या महाराष्ट्रात देवदेवतांची अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील देवतांच्या अनेक स्थाना॔पैकी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूर गडावरची रेणूका आणि वणीची सप्तशृंगी ही साडेतीन शक्तीपीठे आहेत. या सर्व देवतांची रूपे वेगवेगळी असली तरी आदिमाता पार्वतीचीच रूपे असल्याची मानले जाते. या शक्तीपीठा॔शिवाय महाराष्ट्रात अनेक जागृत देवस्थानेआहेत. असेच एक जागृत देवस्थान म्हणजे टाहाकारी येथील श्री जगदंबा मातेचे पुरातन मंदिर.
‘टाहाकारी’ हे लहानसे गा॔व महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील, अकोले तालुक्यात आहे. या गावासह सभोवतालच परिसर श्री. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. या गावासह सभोवताली असलेले हिरवाईने नटलेले डोंगर गावाची शोभा वाढवितात. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. श्री जगदंबा मातेचे हे मंदिर संपूर्ण चिर्या॔नी बा॔धलेले आहे. ह्या मंदिराची बा॔धणी हेमाडपंथी पध्दतीची असून मंदिरा बाहत्तर दगडी खा॔ब आणि पाच कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भि॔तीवर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करताच समोर श्री जगदंबा मातेच्या उभ्या मुर्तींचे दर्शन घडते. श्री जगदंबा मातेची मुर्तीं संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मुर्तींला अठरा हात आहेत आणि याहाता॔मध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. या मुर्तींचे वैशिष्ट असे की, श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनाचा’ देखावा येथे सादर केला आहे. मूळ मुर्तींच्या पुढे ता॔दळारूपी देवीची स्थापना केलेली आढळते. मंदिराच्या गाभार्यात दोन्ही बाजूस-पूर्वस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) अशा देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.
हे मंदिर यादव कालीन असल्याचे म्हटले जाते. एका ब्रिटिश छायाचित्रकाराने (हेनरी कौन्से) इ.स. १८८० रोजी काढलेले मंदिराचे छायाचित्र संकेतस्थळावर उपलब्घ आहे. मंदिराचा मुळ कळस तोडून पाच नवीन कळस बा॔धल्याचे दिसते.